प्रतिनिधी/ बेळगाव
कार्तिक अमावास्येनिमित्त आरटीओ सर्कल येथील सोन्यामारुती मंदिरामध्ये महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अनिल बेनके यांनी या महाप्रसादाला उपस्थिती लावली.
सकाळपासूनच दर्शनासाठी मारुती मंदिरात भाविकांची गर्दी होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाला परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.