प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये कोरोना रूग्णसंख्या कमी दिसत आह़े मात्र चाचण्यांच्या प्रमाणात तुलना केल्यास धक्कादायक बाब समोर येत आह़े शुक्रवारी जिह्यात करण्यात आलेल्या आरटीपीसीआरच्या 203 चाचण्यांमागे 23 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. त्यानसार जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी दर हा 11 टक्क्यांवर जावून पोहोचला आह़े हा धोक्याचा इशारा असल्याचे बोलले जात आह़े तर शुक्रवारी जिह्यात नव्याने 73 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े
जिल्हय़ात शुक्रवारी एकूण 2 हजार 263 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 203 चाचण्यांपैकी 23 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 2 हजार 60 पैकी 50 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळल़े यात मंडणगड-2, दापोली-6, खेड-7, गुहागर-10, चिपळूण-15, संगमेश्वर-5, रत्नागिरी-24, लांजा-4 तर राजापूर-0 असे तालुकानिहाय रूग्ण मिळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 76 हजार 180 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 11 टक्के इतका आह़े
उपचारात असलेल्या 5जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये रत्नागिरी-1, राजापूर-1, दापोली-1, संगमेश्वर-1, लांजा-1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 126 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 72 हजार 628 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.35 इतके आह़े तर 1 हजार 77 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 276 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़