प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटीच्या राणी पार्वतीदेवी आर्ट्स ऍण्ड कॉमर्स कॉलेजच्यावतीने मंगळवार दि. 2 रोजी दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत पी. एल. देशपांडे ओपन थिएटर येथे राष्ट्रीय स्तरावरील आकाशकंदील तयार करण्याची स्पर्धा व विक्री प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
ही स्पर्धा दोन गटात होणार असून, विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिल्या गटात पदवीपूर्व व पदवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, 1 हजार व उत्तेजनार्थ 500 रुपयांची 2 बक्षिसे दिली जाणार आहेत. दुसऱया गटात हायस्कूल विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, 1 हजार व उत्तेजनार्थ 500 रुपयांची दोन बक्षिसे दिली जाणार आहेत.
प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी डॉ. एच. बी. कोलकार 9481562481 किंवा पूजा पाटील 8880803575 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांनी केले आहे.