बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव येथील एसकेई संस्थेच्या राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे दि. 28 सप्टेंबर रोजी क्रांतीवीर सरदार भगतसिंग यांची जयंती साजरी करण्यात आली.
क्रांतीवीर भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे चेअरमन श्री किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित संस्थेचे व्हाईस चेअरमन माजी प्राचार्य एस. वाय. प्रभू, सचिव मधुकर सामंत, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. एस. ए. नाईक, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. एस. एस. शिंदे, विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा. विजयकुमार पाटील, डॉ. एस. एच. पाटील यांनी भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन केले. स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्रा. विजयकुमार पाटील यांनी करून क्रांतिवीर भगतसिंग यांच्या कार्याची माहिती सांगितली. देशभक्ती विद्यार्थ्यांच्या मनात रूजवण्यासाठी भगतसिंह, सुभाष बाबू, सुखदेव, राजगुरू, मंगल पांडे, शिवाजी महाराज, महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, क्रोतीवीर नाना पाटील, राणी चन्नम्मा, या देशभक्तांचे व महापुरूषांचे स्मरण करणे गरजेचे असल्याचे प्रा. विजयकुमार पाटील यांनी सांगितले.