बेळगाव : एसकेई संस्थेच्या आरपीडी कॉलेजच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे स्वामी विवेकानंदांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या डॉ. अचला देसाई, विद्यार्थी कल्याण विभागाचे चेअरमन डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. चंद्रशेखर मुन्नोळी, डॉ. एस. आय. कितली, डॉ. राजेंद्र पोवार, शारीरिक प्रशिक्षक एन. रामकृष्ण व प्राध्यापकांनी केले.
यावेळी विद्यार्थी कल्याण विभागातर्फे श्रीनिधीराव, संपदा कट्टी व श्वेता हंदिगोळ या विद्यार्थिनींनी ‘स्वामी विवेकानंदांचा युवकांना तेजस्वी संदेश’ या विषयावर प्रभावी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी बहुसंख्य प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण विभागाचा प्रतिनिधी विजयकुमार कोलेकर याने आभार मानले.