बेळगाव : आरपीडी पीयू कॉलेज ऑफ आर्ट्स ऍन्ड कॉमर्समध्ये नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत व जिमखाना विभागाचे उद्घाटन असा कार्यक्रम नुकताच पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद हलगेकर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आरपीडी कॉलेजच्या कार्यकारी मंडळाच्या चेअरपर्सन लता कित्तूर होत्या.
यावेळी डॉ. मिलिंद हलगेकर यांनी विद्यार्थ्यांचे वर्तन, तरुणाईमध्ये जाणवणारा विलक्षण ताण आणि त्याला सामोरे कसे जावे? याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकांनी ताण कसा हाताळावा याबद्दलही माहिती दिली.
प्राचार्य काशिनाथ मेळेद यांनी स्वागत केले व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. प्रा. सरस्वती धरणगुत्ती यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. लता कित्तूर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, डी. बी. कलघटगी उपस्थित होते. प्रा. प्रभू यांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास कॉलेजच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक देवेंद्र कुडची, जिमखाना स्टाफ प्रमुख पवनकुमार उपस्थित होते. प्रा. तृप्ती शिंदे आणि प्रा. शीतल देसाई यांनी सूत्रसंचालन केले.