प्रतिनिधी /बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित आरपीडी बीबीए कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षाप्रमाणे औद्योगिक सहलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुनवळ्ळी येथील रेणुका शुगर्स प्रा. लि. या आस्थापनाला विद्यार्थी व शिक्षकवर्गाने भेट दिली. विद्यार्थ्यांनी येथील व्यवस्थापन अध्ययनाची प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती घेतली. तसेच साखर उत्पादन प्रक्रिया व डिस्टिलरी, इथेनॉल, विद्युत उत्पादन केंद्र या सर्व बाबींची माहिती प्रात्यक्षिक स्वरुपात घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी संचालकांसोबत चर्चा करून उत्पादन प्रक्रिया व त्याला अनुसरून व्यवस्थापन अध्ययनाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. ही सहल यशस्वी करण्यासाठी अभयकुमार खोत (जनरल मॅनेजर), वीरय्या विरक्तमठ, डॉ. गोविंद (इथनॉल मॅनेजर) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ही औद्योगिक सहल यशस्वी करण्यासाठी एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले.