वृत्तसंस्था/नवी दिल्ली :
भारतीय रिझर्व्ह बँकेनी(आरबीआय) ‘मणि’ या नावानी एक मोबाईल ऍप सादर केले आहे. ज्याच्या मदतीने अंध लोकांना किमी रुपयाची नोट आहे. यांची ओळख पटवता येणार आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या ऍपचे सादरीकरण केले आहे.
मनी ऍप हे महात्मा गांधी सीरीज आणि महात्मा गांधी(नवीन) सीरीजच्या मदतीने बँक नोटांची पडताळणी करण्यात सक्षम राहणार आहे. ऍप नोटेची पुढील आणि मागील भागासोबत अन्य भागाची पडताळणी करण्यात सक्षम राहणार असल्याचे आरबीआयने सांगितले आहे. आवाजाच्या माध्यमातून सदरचे ऍप हिंदी आणि इंग्रजीमध्ये नोटाचे मूल्य सांगणार आहे. आरबीआयने स्पष्ट केले आहे, की हे ऍप बनावट आणि खरी नोट यांच्यातील फरक सांगू शकणार नाही.
अँड्रॉईड आणि ऍपल दोन्ही ठिकाणी वापरता येणार
अँड्रॉईड आणि ऍपल दोन्ही प्रकारात ऑर्पेटिंग सिस्टमचा उपयोग करुन हे ऍप तयार केले आहे. त्यामुळे याला प्लेस्टोर आणि आयओएस ऍप स्टोरवर मोफत डाऊनलोड करता येणार आहे. एकदा डाऊनलोड केल्यावर या ऍपला वापरण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासणार नाही.