उच्चांकी टप्पा गाठूनही सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारातील सेन्सेक्स चालू सप्ताहातील अंतिम दिवशी शुक्रवारी 132 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. चालू सप्ताहात भारतीय रिझर्व्ह बँकेची (आयआरबी)पतधोरणासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. सदरच्या बैठकीचा अहवाल कंपनीने चार जून रोजी सादर केला आहे. याचाच काहीसा परिणाम दिवसभरातील कामगिरीवर झाला असल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रारंभीच्या काळात बाजारा उंची प्राप्त करण्यात यशस्वी ठरला होता, परंतु आरबीआयच्या अहवालानंतर मात्र बाजारात नाराजीचा सुर राहिल्याचे दिसून आले. दिवसभरातील कामगिरीनंतर सेन्सेक्स 132.38 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,100.05 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 20.10अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक हा 15,670.25 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांपैकी सेन्सेक्समध्ये सर्वाधिक दोन टक्क्यांनी नेस्ले इंडियाचे समभाग राहिले आहेत. यासोबतच भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनि आणि डॉ.रेड्डीज लॅब यांचे समभाग घसरले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये तेजी प्राप्त केलेल्या कंपन्यामध्ये बजाज फिनसर्व्ह, ओएफनजीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, बजाज फायनान्स आणि एचडीएफसी यांचा समावेश आहे.
वृद्धीदराचा अंदाज घटविला
आरबीआयने चालू आर्थिक वर्षात आर्थिक वाढीचा अंदाज हा 10.5 टक्क्यांनी घटून 9.5 टक्क्यांवर राहणार असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. तसेच आरबीआयने अर्थव्यवस्थेला सहारा देण्यासाठी पतधोरणाची स्थिती कायम ठेवण्यासाठी विश्वास देत आपला रेपोदर 4 टक्क्यांवर कायम राहणार असल्याचे सांगितले आहे. या घडामोडीचा सर्वाधिक प्रभाव भारतीय शेअर बाजारावर राहिला असल्याचे अभ्यासकांनी यावेळी सांगितले आहे.
विदेशी बाजार घसरले
कोरोनाच्या संसर्गाचा दर दिवसागणिक कमी होत असल्याने, लसीकरण अभियानातील तेजी राहिल्यास व राज्यांमधील लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यास बाजारातील स्थिती सकारात्मक राहणार असल्याचेही संकेतही अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केले आहेत. यामध्ये हाँगकाँग, टोकीओ आणि सोल येथील शेअर बाजार नुकसानीत राहिले आहेत. युरोपीय बाजारही घसरणीसह बंद झाल्याची नोंद आहे.