वृत्तसंस्था/ मुंबई
आरबीएल बँक आणि आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल लाइफ इन्शुरन्स यांनी भागिदारी केली असून त्याद्वारे बँकेच्या ग्राहकांना जीवन विमा उत्पादने पुरवली जाणार आहेत. या भागिदारीमुळे आरबीएल बँकेच्या 8.7 दशलक्ष ग्राहकांना कंपनीची ग्राहककेंद्रीत संरक्षण आणि दीर्घकालीन बचत उत्पादने सहजपणे खरेदी करता येतील. तसेच त्यांच्या मदतीने स्वतःसाठी व कुटुंबासाठी आवश्यक आर्थिक संरक्षण मिळवता येईल.
आरबीएल बँकेद्वारे आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल लाइफची उत्पादने 28 राज्यात पसरलेल्या आपल्या 398 शाखा आणि बँकेच्या मल्टी-चॅनेल वितरण नेटवर्कचे वैशिष्टय़ असलेल्या इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग टच पॉइंट्सद्वारे वितरित केली जातील. ही भागिदारी त्यांचे मल्टी-चॅनेल वितरण नेटवर्क आणखी मजबूत करणारी असेल.
या भागिदारीच्या माध्यमातून आयसीआयसीआय प्रुडेन्शीयल लाइफची संरक्षण आणि बचतीशी संबंधित सर्व उत्पादने बँकेच्या ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून दिली जातील. प्रुडेन्शीयल लाइफची संरक्षण उत्पादने आर्थिक योजनांसाठी मजबूत पाया मिळवून देतात. संयुक्तपणे दीर्घकालीन बचत उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर केली जाणार असून बँकेच्या ग्राहकांना त्यांची संपत्ती- निर्मिती, निवृत्तीनंतरचे नियोजन किंवा मुलांचे उच्च शिक्षण अशा प्रकारची आर्थिक ध्येये पूर्ण करण्यासाठी मदत करतील.