वारणानगर / प्रतिनिधी
आरळे ता. पन्हाळा येथील पाटील – चिखलकर वॅर्कशॉप मधील सुमारे चार लाख रुपयाच्या तांब्याच्या धातूच्या स्क्रॅप अज्ञात चोरट्यांनी बुधवार दि. १० रोजी रात्री उशिरा लांबवले आहेत. याबाबत कोडोली पोलीसात गुन्हा दाखल झाला असून याबाबत तानाजी मारुती पाटील यांनी तक्रार नोंदवली आहे.
तक्रारदार मारूती पाटील यांचा तांबे धातुची भांडी बनविनेचा व्यवसाय आरळे येथे आहे. या कामासाठी चारशे रुपये किलो रूपये प्रमाणे मोठ्या प्रमाणात स्क्रॅप खरेदी केली जाते.यातील सुमारे एक हजार किलो ताब्यांच्या धातूचे स्क्रॅपवर अज्ञात चोरट्यांनी चोरला आहे. या गुन्हयाचा स.पो.नि.दिनेश काशिद करीत आहेत.