दक्षिणेतील सुपरस्टार रामचरणसोबत करणार काम
अभिनेत्री कियारा आडवाणी लवकरच एस. शंकर यांच्याकडून दिग्दर्शित होणाऱया ‘आरसी-15’ या चित्रपटात दक्षिणेतील सुपरस्टार राम चरणसोबत दिसून येणार आहे. चित्रपटाचे निर्माते सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून चित्रिकरण सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
कियारा या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत आहे. आरआआर या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करताच रामचरण ‘आरसी-15’च्या चित्रिकरणात सामील होणार आहे. दिल राजू यांच्याकडुन निर्मित ‘आरजी-15’ चित्रपट ऍक्शनदृश्यांनी भरलेला असणार आहे. चित्रपटात राम चरण एका पोलीस अधिकाऱयाच्या व्यक्तिरेखेत दिसून येईल.
चित्रपटाचे चित्रिकरण 6 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आरसी-15चे चित्रिकरण पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत पूर्ण व्हावे अशी दिग्दर्शक एस. शंकर यांची इच्छा आहे. कियारा यानिमित्ताने पहिल्यांदाच दक्षिणेतील मोठय़ा अभिनेत्यासोबत काम करणार आहे.