पुदिना म्हटल्यावर आपल्या डोळय़ासमोर येते ती हिरवीगार चटणी. पुदीनाच्या चटणीशिवाय पाणीपुरीला मजाच येत नाही. ही एक औषधी वनस्पती असून हिचे अनेक फायदे आहेत.
आरोग्यदायी पुदिन्याचे फायदे
पचन होते सुलभ
पाचन प्रणालीला शक्तिशाली बनवण्यात मदत करते. पोट बिघडल्यास एक कप पुदिन्याचा चहा प्यावा. पुदिन्याच्या वासाने लाळ ग्रंथी सक्रिया होतात.
स्मरणशक्तीला चालना
रिसर्चनुसार पुदिना माणसातील जागरुकता, धारणशक्ती आणि संज्ञानात्मक क्रियेचा प्रभाव वाढवताना आढळते. ज्यानुसार ‘एक्सपर्ट’ या निर्णयावर पोहोचले आहेत की, जी लोकं च्युइंग गम खातात. ज्यामध्ये पुदिना मुख्यतः असतो, त्यांची स्मरणशक्ती इतरांच्या तुलनेत जास्त सतर्क असते. काही रिसर्चमध्ये हेही आढळलं आहे की, पेपरमिंट तेलाच्या सुवासाने तुमची स्मृती आणि सतर्कता वाढू शकते. पण याबाबत अजून अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी
कर्करोगापासून बचावासाठी पुदीन्याची मदत होते कारण इतर औषधी वनस्पतींप्रमाणेच पुदिन्यातही कर्करोगाविरोधी अनेक गुण आढळतात.
वेदनाशामक पुदिना
अनेक प्रकारच्या वेदनाशामक बामांमध्ये पुदिन्याचा अर्क मुख्य घटकाच्या रुपात वापरला जातो. ज्या भागात वेदना होते किंवा जखम होते त्या ठिकाणी पुदिनायुक्त बाम लावल्यास थंडावा मिळतो. पुदिन्यातून निघणाऱया बाष्प श्वासाद्वारे हुंगल्यासही फरक पडतो. यामुळे संपूर्ण शरीराला आराम मिळतो.
कफ आणि सर्दीवरही गुणकारी
मिंटमधील तीव्र गंध नाकाद्वारे शरीरात जाऊन श्वसन प्रक्रिया सुलभ करते. हे कफ शरीराबाहेर टाकण्यास मदत करते. खोकल्याचा त्रास होतो तेव्हा पुदिन्यातील एंटी बॅक्टेरियल आणि एंटी इन्फ्लामेंट्री गुणांमुळे श्वसन तंत्र सुलभ होण्यासोबतच घशाची सूजही कमी होते. खोकल्याचा त्रास होत असेल तर त्यावर पुदिन्याच्या पानांचा रस गरम पाण्यात घालून त्याची वाफ घ्यावी.
पाळीच्या दिवसातील वेदनांवरही गुणकारी
पुदिन्याची पान रक्त शुद्ध करतात आणि आपल्या शरीरातील शांत मांसपेशींवर याचा aहूग्-sज्asस्द्ग्म् †िाम्t पडतो. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांतील वेदना दूर करण्याचाही हा एक चांगला उपाय आहे. उपाय म्हणून तुम्ही पुदिन्याच्या चहाचा एक कप गरम काढा बनवून घ्यावा आणि तो दिवसभर घोट घोट पीत रहावा. गर्भाशयाला शांत करतो.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
पुदीन्याच्या पोटावर होणाऱया प्रभांवामुळे गर्भवती महिलांसाठीसुद्धा हे उत्तम आहे. हे पचन प्रक्रियेसाठी एंजाईम सक्रीय करून मॉर्निंग सिकनेसमुळे होणारी मळमळ दूर करण्यात मदत करतं. सकाळी उठल्यावर पुदिन्याची काही पाने चावून खाणे किंवा वाटलेल्या पुदिन्याच्या पानांचा वास घेणं ही योग्य पद्धत आहे. पण गर्भवती महिलांनी एक लक्षात ठेवावं की, याचा वापर बाळ झाल्यावर करू नये. कारण याचा प्रभाव स्तनपानावर होऊ शकतो.
प्रतिकारक्षमतेसाठी
पुदिन्याच्या पानांमध्ये ‘कॅल्शयिम’, ‘फॉस्फोरस’, सी, डी, ई आणि बी कॉम्प्लेक्स ही जीवनसत्वेही थोडय़ा प्रमाणात आढळतात. ही सर्व तत्त्व एकत्रितपणे शरीराची प्रतिकारक्षमता वाढवतात. ज्यामुळे शरीराचं संक्रमणांपासून आणि सूज येण्यापासून संरक्षण होतं.