बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात शनिवारपर्यंत कोविड -१९ लसीकरण कव्हरेजने साडे सहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवार पर्यंत कर्नाटकात ६,५४,६४६ जणांना लसीकरण करण्यात आले. परंतु चिंतेचे कारण म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचा पहिला डोस मिळण्याचा शेवटचा दिवस होता आणि शनिवारपर्यंत फक्त ५२ टक्के लोकांना लसी दिली गेली होती.
शनिवारी सायंकाळी ५.३० पर्यंत ८,२१,९३९ आरोग्य कर्मचार्यांच्या उद्दिष्टांपैकी केवळ ४,२३,६०३ ज्यांना लसीकरण करण्यात आले, जे प्रमाण ५२ टक्के आहे. आतापर्यंत १,११,९३५ आरोग्यसेवा कामगारांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण आरोग्य कर्मचार्यांपैकी ४२ टक्के पेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले होते. दरम्यान अग्रभागी २,८४,९५० कामगारांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. परंतु लक्षित लाभार्थ्यांपैकी १,१९,१०८ जणांना लस देण्यात आली आहे.
शनिवारी संध्याकाळी ५.३० पर्यंत कोविड लसीकरणाच्या ३६ व्य दिवशी म्हणजेच १६ जानेवारीपासून २० तारखेपर्यंत आरोग्य सेवा कामगारांच्या ५९ टक्के कर्मचार्यांना लस देण्यात आली आहे. ११,०६,८८९ च्या लक्ष्यापैकी सुमारे ५९ टक्के आरोग्यसेवा कामगारांना ही लस दिली गेली. शनिवारी केवळ ६६,८४८ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. परंतु यापैकी २१,९३५ जणांना लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत दोन गंभीर एईएफआय घटना आणि चार मृत्यूंसह २० गंभीर एईएफआय झाल्या आहेत. शनिवारी दोन गंभीर घटना घडल्या.