लवकर निजे,लवकर उठे त्याला आयुरारोग्य लाभे,’ ही म्हण आपण अगदी आपल्या लहानपणापासून ऐकत आलो आहे.मात्र लवकर जाग येत नाही म्हणून किंवा आळसामुळे आज आपण लवकर उठणे हे जवळजवळ विसरुनच गेलो आहोत. सकाळी लवकर उठल्याने दिवसभरातील कामे वेळेत होतात व कामाचा ताण कमी होतो. कामे घाईघाईत करण्याचे किंवा टाळण्याचे प्रमाण कमी होते. साहजिकच आपला संपूर्ण दिवस प्रेश जातो.
सकाळ होते ती आपल्यावरील जबाबदाऱयांच्या नियंत्रणासाठी. आपण प्रात:काळचा विनियोग शहाणपणाने केला तर आपण एक आनंददायी आणि अधिक उत्पादनक्षम जीवनाचा अनुभव घ्याल. जेंव्हा आपल्यापैकी अनेकजण अंथरुणातच असतात तेव्हा काही दिग्गज दैनंदिन आरोग्यात सुधारणा करण्यात दंग असतात, त्यांचे जीवनमान, कारकीर्द आणि व्यक्तिगत जीवन कोणत्याही नुकसानाशिवाय व्यतीत करत असतात.
याउलट रात्री उशिरापर्यंत जागरण केल्याने शरीराला आठ तासांची पुरेशी व निवांत झोप मिळत नाही. याचा विपरित परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणून आपण लवकर उठण्याचा प्रयत्न करतो.पण सकाळीअगदी गजर लावूनही उठण्यात यश येत नाही.
इतर कामापेक्षा पुरेशा झोपेला प्रथम प्राधान्य द्या. यासाठी रात्री ठरवून वेळेवर झोपा व सकाळी लवकर उठा.
रात्री उशीरा झोपल्याने दुसऱया दिवशी सकाळी लवकर उठणे तुम्हाला शक्मय होत नाही. मग या गोष्टीची तुम्हाला सवयच लागते. सर्वप्रथम ही सवय बदला. रात्री झोप येत नसेल तर रात्री एक ग्लास कोमट दुध घ्या. शतपावली करा. ज्यामुळे तुम्ही लवकर झोपू शकाल.
ठरवल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी जाग आली नाही तर लगेच धीर सोडू नका. तुमच्या शरीराला उशिरा उठण्याची सवय लागली आहे, ही सवय मोडायला थोडा वेळ लागेल.जरी पहिल्या दिवशी तुम्हाला वेळेत जाग आली नाही तरी आठवडाभर प्रयत्न केल्यास तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागेल.त्यामुळे प्रयत्न करीत रहा.
सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करण्यासाठी आधी छोटे-छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पहिल्या दिवशी नेहमीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी झोपा व दुसऱया दिवशी 15 मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. मग दुसऱया दिवसापासून 30 मिनिटे आधी झोपा व 30 मिनिटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. अशा रितीने तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळी सकाळी लवकर उठण्यात यश मिळवू शकता.
कधीही दुपारी झोपू नका.कारण दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही व त्यामुळे पुन्हा सकाळी लवकर जाग येत नाही.दुपारची झोप टाळण्यासाठी स्वत:ला इतर गोष्टी किंवा तुमच्या आवडीच्या छंदामध्ये मध्ये गुंतवा.
पुस्तके वाचा किंवा सुवासिक चहा घ्या किंवा ज्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल, अशी एखादी गोष्ट ठरवून रोज रात्री करा. ज्यामुळे ती गोष्ट केल्यावर तुमच्या शरीराला झोपण्याची वेळ झाली असे वाटेल.
आठवडाभरात तुम्ही जी कामे करणार आहात, त्याचे आधीच नियोजन करा. रोजच्या कामामध्ये तुम्हाला उत्साहीत करणारी कामे सकाळी सकाळसाठी ठरवा.जसे की मित्राला फोन करणे किंवा एखाद्या नवीन जागी भेट देणे, ज्यामुळे तुम्हाला सकाळी उठण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.