प्रतिनिधी /बेळगाव
महापालिका निवडणूक झाली तरी अद्याप प्रशासकीय राजवट आहे. पण प्रशासकीय राजवटीतच आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांमधील अंतर्गत वाद वाढत चालले आहेत. आरोग्य अधिकारी व पर्यावरण अधिकाऱयांमधील वाद वाढला असून अंतर्गत वादाचा फटका कार्यालयातील कामावर आणि कर्मचाऱयांवर होत असल्याची टीका नागरिक करीत आहेत.
महापालिका कार्यालयातील आरोग्य विभागाचे कामकाज हाताळण्याच्या मुद्यावरून वाद सुरू होते. आरोग्य अधिकारी आणि पर्यावरण अधिकाऱयांमध्ये याबाबत शीतयुद्ध सुरू होते. याचदरम्यान स्वच्छतेच्या कारणास्तव आरोग्य अधिकाऱयांनी पर्यावरण अधिकाऱयांना नोटीस बजावल्यानंतर दोन्ही अधिकाऱयांचा वाद उफाळून आला आहे. महापालिका आयुक्तांच्या समोरच अधिकाऱयांमध्ये हमरी-तुमरी झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱयामधील दरी वाढली आहे. सध्या दोन्ही अधिकाऱयांमधील वाद वाढत चालला असून कोणत्या पर्यावरण अभियत्यांनी कुणाच्या आदेशानुसार काम करायचे, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
नागरिकांच्या कामांना विलंब
अधिकाऱयांच्या वादाचा फटका कार्यालयीन कामावर होत असून नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच दोन्ही अधिकारी आपल्यापरीने कामकाज सांगत असल्याने कार्यालयात कर्मचाऱयांनादेखील अडचण झाली आहे.
शहराच्या स्वच्छतेचे कामकाज आरोग्य विभागातील पर्यावरण अभियंत्यांच्या देखभालीखाली चालते. आयुक्तांच्या आदेशानुसार कामकाज करीत असतात. पण माझ्या सांगण्यानुसार स्वच्छतेचे काम करणे आवश्यक असल्याचा दावा आरोग्य अधिकाऱयांनी केला असल्याने वाद वाढत चालले आहेत. वास्तविक पाहता सीऍण्डआर नियमानुसार अधिक्षक अभियंत्यांच्या अखत्यारित पर्यावरण सहाय्यक कार्यकारी व पर्यावरण अभियंत्याचे काम चालते. आरोग्य अधिकारी, अधिक्षक अभियंते, सामान्य प्रशासन उपायुक्त, महसूल उपायुक्त, नगर योजना अधिकारी, कौन्सिल सेपेटरी असे विविध विभाग प्रमुखाचे कामकाज आयुक्तांच्या अखत्यारित
चालते. त्यामुळे स्वच्छतेसंदर्भात कोणत्याही प्रकाच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी अधिक्षक अभियंत्याच्या सूचनेनुसार काम करण्याची गरज आहे. पण सी ऍण्ड आर नियमावलीनुसार काम करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागात अधिकाऱयांमधील वाद वाढत चालले असून कामकाजावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.