जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण यांच्याशी जिव्हाळय़ाचे संबंध जोपासणारे डॉ.कदम
प्रतिनिधी/ सातारा
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात ज्येष्ठ आर्थोपेडिक तज्ञ डॉ. संजोग सिताराम कदम यांची नुकतीच पुणे येथील परिमंडळ आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या पदोन्नतीमुळे जिल्हा रुग्णालयातल्या रुग्णांना आपुलकीने सेवा देणारे, नातेवाईकांना आधार देणारे, कर्मचाऱयांशी जिव्हाळा राखणारे अशीच त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीने झालेल्या बदलीने रुग्णालय आता पोरके झाले आहे.
डॉ. संजोग कदम यांची पुणे येथे पदोन्नतीने बदली झाली. त्यांनी पदभारही स्वीकारला. त्यांची उपसंचालकपदी म्हणून पदोन्नती झाली असून त्यांच्या अखत्यारित पुणे, सातारा, सोलापूर हे तीन जिल्हे आहेत.
डॉ. संजोग कदम हे सातारा जिह्यातीलच. 1988 पासून वर्ग 2 अस्थिरोग विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. याच कार्यकाळात त्यांनी रुग्णांना सेवा देताना एक जिव्हाळय़ाचे आपुलकीचे नाते जोडले गेले. रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असे म्हणून त्यांनी काम केले. जिल्हा रुग्णालयात येणाऱया अनेक रुग्णांना उपचार करताना त्यांच्या वेदनेशी समसर झाले. त्यांच्यावर उपचार करताना हळव्या मनाचे असलेले डॉ. संजोग कदम यांच्या उपचारामुळे रुग्णही बरे होत अन् नातेवाईकांनाही आधार मिळत होता. त्यामुळे डॉ. संजोग कदम यांच्या सेवेमुळे आजही ग्रामीण भागात ज्यांनी जिल्हा रुग्णालयात सेवा घेतली ते त्यांना मानतात. 1999 ला त्यांची अस्थिरोग तज्ञ वर्ग 1 या पदावर पदोन्नती झाली. गेली 22 वर्ष आर्थोपेडीक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आरोग्य सेवेचा 33 वर्षाचा अनुभव आहे. गतवर्षी पडत्या काळात त्यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार होता. तीन महिने अतिशय चांगले काम केले. कर्मचाऱयांमध्ये काम करताना जवळचे स्नेहभाव निर्माण केले होते. सोमवारी राज्य शासनाने त्यांची पुणे येथे उपसंचालक म्हणून पदोन्नती केले. त्यांनी पदभारही स्वीकारला. चतुर्थश्रेणीतील कर्मचाऱयांच्या पदोन्नती व इतर प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.