कणबर्गी, गांधीनगर येथे अधिकाऱयांनी केली कारवाई, ऍलोपॅथिक औषधांचा साठा जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी येथील सिद्धेश्वर क्लिनिकवर आरोग्य खात्याच्या डॉक्टरांनी धाड टाकून क्लिनिकला टाळे ठोकले. या क्लिनिकचे डॉ. लक्ष्मण मालाई हे विनापरवाना रुग्णांना मोठय़ा प्रमाणात ऍलोपॅथिक औषधे देत होते. त्यांनी कोणताही परवाना घेतला नव्हता. त्याचप्रमाणे गांधीनगर येथील अडीव्याप्पा आदीन्नावर यांच्या समृद्धी क्लिनिकलाही अधिकाऱयांनी टाळे ठोकले.
दोन्हीही डॉक्टरांनी केपीएमईए कायद्याखाली परवाना घेतला नव्हता. अशा डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्य धोक्मयात येवू शकते. याची दखल घेऊन आरोग्य व औषध नियंत्रण खात्याने ही कारवाई केली. केपीएमईएचे नोडल अधिकारी एम. व्ही. किवडसण्णावर, तालुका आरोग्याधिकारी डॉ. शिवानंद मास्तीहोळी, आरोग्य निरीक्षक मंजुनाथ बिसनळ्ळी यांनी ही कारवाई केली. तसेच पुढील तपास सुरू आहे.