प्रतिनिधी / दापोली
राज्याच्या आरोग्य विभागाच्या दर्जात्मक वाढीसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कमी व्याजाने चार हजार रुपये चार हजार कोटी कर्ज घेण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दापोली येथे बोलताना दिली दापोली येथे खाजगी दौऱ्यावर ते आले असता उपजिल्हा रुग्णालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की कोकणातील आरोग्य विभागातील रिक्त जागांचा प्रश्न गंभीर आहे.
या जागांची या रिक्त जागांची संख्या देखील मोठी आहे. याकरिता कोकणातील आरोग्य विभागातील रिक्तजागा चक्राकार पद्धतीने भरण्यास प्राधान्य देण्यात येईल, अशी हमी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दापोली येथे पत्रकारांशी बोलताना दिली.