विद्यार्थ्यांमधून संताप, संघटनांकडून प्रशासनाचा निषेध
प्रतिनिधी / कोल्हापूर
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या क व ड संवर्गाच्या 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱया परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्या. परीक्षेसाठी काही परीक्षार्थी केंद्रावर हजर होते, तर काही प्रवासात होते. मात्र अचानक परीक्षा रद्द झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन, श्रमीक संघटना, भारतीय विद्यार्थी मोर्चा, भाजप युवा मोर्चाकडून प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
नर्सेस युनियनचे सोमवारी मंत्रालयासमोर आंदोलन
ऐनवेळी परीक्ष रद्द झाल्याने महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच आरोग्य विभागातील बोगस कारभार थांबवून राज्य शासनाने आरोग्य विभागातील भरती प्रक्रीया पूर्ण करावी यामागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. तसेच सोमवार 27 रोजी मुंबई येथे मंत्रालयासमोर शासनाच्या भोंगळ काराभारा विरोधान आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याभरातील नर्सेसनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युनियनकडून करण्यात आले.
यावेळी युनियनचे राज्यअध्यक्ष सतीश सर्वगोडे यांनी ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचा प्रशासनाचा निर्णय परीक्षार्थींना मनस्ताप देणारा असल्याचे सांगितले. राज्य सचिव डेव्हीड लोखंडे यांनी खाजगी कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. खाजगी कंपनीचे टेंडर मागे घेवून एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात याव्या. तसेच डीएचएस, डीएमईआरमधील नर्सिंगच्या सर्व भरती तत्काळ करण्याची मागणी केली. पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी तेजस कागवाडे यांनी मुंबईत मंत्रालयासमोर करण्यात येणाऱया आंदोलनास राज्यभरातील नर्सेसनी पाठींबा देवून मोठÎासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी श्रमिक संघटनेच्या महिला प्रतिनिधी सुवर्णा तळेकर, नर्सेस युनियनचे अर्पिता पाटील, अभिजीत हूपरीकर, अमोल देसाई, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिकेत गायकवाड, निलेश बंडवळ, विपूल गायकवाड आदी उपस्थित होते.