कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी लावला हातभार
प्रतिनिधी / बेळगाव
आरोग्य विभागात सेवा बजावून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱय़ाने पंतप्रधान व मुख्यमंत्री निधीसाठी भरीव देणगी दिली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला आहे.
कोरोना थोपविण्यासाठीच्या लढाईत आपलाही वाटा असावा म्हणून निवृत्त सुपरवायझर शिवनप्पा खनगण्णी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निधीसाठी 1 लाख 11 हजार रुपये व पंतप्रधान निधीसाठी 2 लाख 22 हजाराचा धनादेश दिला आहे.
आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. अप्पासाहेब नरट्टी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी एस. व्ही. मुन्याळ, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी रमेश मडिवाळ, यांच्या उपस्थितीत शिवनप्पा यांनी धनादेश सुपुर्द केला. आरोग्य विभागातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.