वार्ताहर / मालवण:
मालवण नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांसह बाहेरून आलेल्या नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना व जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेशानुसार त्यांच्या मोबाईलमध्ये Play Store मधून Aarogya Setu App डाऊनलोड करून कार्यान्वीत करणे बंधनकारक आहे. जेणेकरून आसपासच्या परिसरात कोरोना विषाणूचा संशयित रुग्ण असल्यास अथवा नव्याने आल्यास त्याबाबतची सूचना Aarogya Setu App द्वारे आपल्याला तात्काळ मिळू शकते. याकरिता Bluetooth नेहमी On mode वर ठेवावे. आपल्या स्वत:च्या व समाजातील इतरांच्या सुरक्षिततेसाठी Aarogya Setu App मध्ये स्वतःची सर्व माहिती योग्यरित्या भरून स्वयंचाचणी घ्यावी व त्याचा कार्यक्षमपणे वापर करावा, यासंदर्भात कोणातीही अडचण असल्यास मालवण नगरपरिषदेच्या टोल फ्री क्रमांक 18002334381 वर संपर्क साधावा.