प्रतिनिधी / बेळगाव
आपल्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असेल तर आता आपल्याला मोबाईल त्यांचा संदेश मिळणार आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण खात्याच्यावतीने ‘आरोग्य सेतु कोविड -19 ऍप’ निर्मिती केली आहे. हा ऍप प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे, आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी केले आहे.
या ऍपमुळे मोबाईलमध्ये आपणाला आपल्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्यास सतर्कतेचा संदेश मिळणार आहे. ट्रकर मोबाईल ऍप असे याला संबोधले जाते. आपल्या परिसरातील कोणत्याही व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाली असेल तर मोबाईल सतर्कतेचा संदेश मिळणार त्यानंतर आपण तातडीने सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातारण पसरले आहे. कोरोना कोणाला झाला आहे. हे समजत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आल्यावर त्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण होऊ शकते यासाठी जनतेने अर्लट राहण्यासाठी या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. तरी सर्व सरकारी कर्मचारी व जनतेनेही हा ऍप डाऊनलोड करावे, असे त्यांनी कळविले आहे.
कोरोनामुळे जगात हाहाकार माजला आहे. या आजारामुळे अनेक जण दगावत आहेत. यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे कोरोना संशयित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना लागण झाल्याचा अहवाल तब्बल 8 ते 10 दिवसानंतर मिळत आहे. रूग्णाला केवळ काही लक्षणावरून त्याला संशयित म्हणून ठरविले जाते. कोरोना झाल्याचे तातडीने समजत नाही सर्व सामान्य व्यक्तीप्रमाणेच तो वावरत असतो. त्यामुळे तो अनेकांच्या संपर्कात येतो. त्यामुळे इतरांनाही त्यांची लागण होत आहे. त्यामुळे हा आता आरोग्य सेतु कोवीड-19 ऍप भारत सरकारने निर्माण केला आहे.