प्रतिनिधी/ मडगाव
बँक ग्राहकाचा विश्वास संपादन करुन ग्राहकालाच 1.20 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप असलेल्या आर्लेम येथील आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकाची तसेच या प्रकरणातील संशयितांची बँक खाती गोठविण्याचे आदेश तपास यंत्रणेने संशयितांच्या संबंधीत बँकांना दिलेले आहेत.
या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या तपास यंत्रणेतील एका अधिकाऱयाने ही माहिती दिली.
या प्रकरणातील संशयितांची बँक खाती असलेल्या बँकांना त्यांची खाती गोठविण्यात यावी असा लेखी आदेश जारी करण्यता आल्याचे या अधिकाऱयाने तपास यंत्रणेला सांगितले.
आयसीआयसीआय बँकेच्या आर्लेम शाखेतील तत्कालीन शाखा व्यवस्थापक गुल्शन गुसाई, आर्लेम शाखेतील या बँकेचे कर्मचारी, बंगळूर येथील ए. एस. एन्टरप्रायझेसचे संचालक, बंगळूर येथील मेसर्स लोहरी कस्टम फर्निचर या आस्थापनाचे संचालक तसेच बाप्तीस्ता जोजेफ फर्नाडिस हे या प्रकरणातील संशयित आरोपी असल्याचे तपास यंत्रणेने यापूर्वीच नोंद केलेल्या गुन्हय़ात नोंदणी केलेली आहे.
पै नावाच्या एका ग्राहकाच्या खात्यात असलेल्या एकूण रकमेपैकी संशयितानी सुमारे 1.20 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे उघडकीस आलेले आहे. या प्रकरणासंबंधी लवकरच धरपकड सुरु होणार असल्याचेही संकेत तपास यंत्रणेने दिले आहेत.
तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार मडगावातील एस. पै काणे हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. या प्रकरणातील बँक व्यवस्थापक गुल्शन गुसाई याने तक्रारदाराकडून कोऱया धनादेशांवर सही घेऊन आयसीआयसीआय प्रुडन्शियल लाईफ इन्शुरन्स या विमा कंपनीच्या पॉलिसीचे हप्ता भरतो असे सांगून 1 कोटी 20 लाख 50 हजार रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप तक्रारदाराने पोलिसात केलेल्या तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी वरील संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 403 (मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे), 406 ( मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार केल्याप्रकरणी शिक्षा होणे), 409 बँक व्यवसायिकाने केलेला फौजदारीपात्र गुन्हा), 418 (ज्या व्यक्तीचे हित जपण्याची जबाबदारी आहे त्या व्यक्तीला हानी पोहोचेल याची जाणीव असणे), 420 (जाणीवपूर्वक फसवणूक करणे), 468 (फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवाबनवी करणे), 471 (कागदपत्रे बनावट आहेत याची कल्पना असून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून प्राधिकरणाकडे सादर करणे) या कलमाखाली यापूर्वीच गुन्हा नोंद केलेला आहेत.