पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीस न्यायालयात वाढीव रिमांड न मागण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याने खाजगी इसमाद्वारे चार लाख रुपयांची मागणी केली. यामध्ये 70 हजार रुपये लाच देण्यातही आली. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशाल काटे यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमर पाटील यांच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पाटील यांना न्यायालयाकडून एक दिवसाची पोलिस कस्टडी देखील मिळाली. यामध्ये विशाल काटे या इसमाने पाटील यांच्या बंधूंना आरोपीस पोलीसांकडून वाढीव पोलिस कस्टडी न मागण्याची मागणी करण्यासाठी चार लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. काटे याने पोलीसअधिकार्यांशी असलेल्या संगनमतामुळे लाचेची मागणी केली असल्याचे प्राथमिक तपासावरुन निष्पन्न झाले आहे.
यामध्ये काटे यास चार लाख रुपयांपैकी पहिल्या हप्त्याची रक्कम दोन लाखांपैकी 70000 स्वीकारून एम एच 13 डी इ 4280 मधून पळून गेले आहेत. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्यातील कुठल्या पोलीस अधिकार्याशी संबंध आहेत. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तर असा कुठलाही पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी जर सापडला तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल. असे संकेत यानिमित्ताने पोलीस अधीक्षका तेजस्वि सातपुते यांनी दिले आहेत.