प्रतिनिधी / बेळगाव
आर्ट्स सर्कलच्या कार्यकारिणीची बैठक मंगळवार दि. 22 रोजी झाली. यामध्ये कोविडच्या साथीमुळे वार्षिक सर्वसाधारण सभा अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारकडून अधिक व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी मिळाल्यानंतर लवकरात लवकर वार्षिक सभेचे आयोजन करण्यात येईल, याची सभासदांनी नोंद घ्यावी, असे अध्यक्षा लता कित्तूर यांनी कळविले आहे.