गोवा, धारवाड, निपाणी, बेंगळूर, देवगड, पुण्यासह 80 स्पर्धकांचा सहभाग : रवींद्र माने-तेजस काटोटी यांचा सन्मान
प्रतिनिधी / बेळगाव
आर्ट्स सर्कलतर्फे दि. 30 व 31 जानेवारी रोजी शास्त्रीय गायन, भक्तिगीत गायन, संवादिनी वादन स्पर्धा बालिका आदर्श विद्यालयात पार पडल्या. कोविड-19 मुळे 2020 सालच्या स्पर्धा आता घेण्यात आल्या. गोवा, धारवाड, निपाणी, बेंगळूर, देवगड, पुणे व स्थानिक मिळून 80 स्पर्धकांचा स्पर्धेत सहभाग होता.
स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे-
शास्त्रीय गायन-लहान गट, पुसाळकर ट्रॉफी-1) हृषिकेश ढवळीकर-गोवा, 2) सृजना भट-बेंगळूर, 3) तन्मयी हेगडे-धारवाड. परीक्षक उषा रानडे, सीमा कुलकर्णी.
शास्त्रीय गायन-मोठा गट, डी. आर. उरणकर ट्रॉफी-1) तन्वी इनामदार- बेळगाव 2) अनुष्का आपटे-बेळगाव, 3) पलशप्रिया दास-धारवाड. परीक्षक-निरंजन मूर्ती, यादवेंद्र पुजारी.
शास्त्रीय गायन-खुला गट, कृष्णराव हरिहर ट्रॉफी-1) ईशा घाटे-गोवा, 2) अनुष्का आपटे-बेळगाव, 3) विनायक इनामदार-धारवाड, उत्तेजनार्थ-गुरुदास गावकर-गोवा, परीक्षक-जगन्नाथ धर्माधिकारी, राजप्रभू धोत्रे.
भक्तिगीत गायन-लहान गट, कबाड रत्नाबाई सुब्बराव ट्रॉफी-1) सात्विक भंडारी-बेळगाव, धन्या पाटील-बेळगाव, हृषिकेश ढवळीकर-गोवा, उत्तेजनार्थ-अथर्व शेटय़े, स्वामिनी शहापूरकर-बेळगाव, परीक्षक-लक्ष्मी तिगडी, मेघना पाटील. भक्तिगीत गायन-मोठा गट, व्यंकटराव मुधोळ ट्रॉफी-1) अनुष्का आपटे-बेळगाव, सुधांशू सोमण-देवगड, 2) शरधी हेगडे-बेळगाव, उत्तेजनार्थ तन्वी इनामदार- बेळगाव, परीक्षक गुरुराज कुलकर्णी, मंजिरी गोरे.
भक्तिगीत गायन-खुला गट, गोगटे गुरुजी ट्रॉफी-1) ईशा घाटे-गोवा, 2) विनायक इनामदार-धारवाड, 3) अनुष्का आपटे-बेळगाव, उत्तेजनार्थ-राजेंद्र कर्नाटकी-बेळगाव, परीक्षक-संजय देशपांडे, रोहिणी गणपुले.
संवादिनीवादन-खुला गट, परशुराम दुदोजी कुडूचकर ट्रॉफी-1) नचिकेत हरिदास-पुणे, 2) मालू गावकर-गोवा, 3) रोहित भारद्वाज-बेंगळूर, उत्तेजनार्थ-श्रीया वेल्हाळ-पुणे, तेजस काटोटी-बेंगळूर, शारंग बेळुब्बी-बेळगाव, स्मृती चिकोडी-बेळगाव, परीक्षक-दीपक मराठे, रवींद्र माने.सर्वप्रथम आर्ट्स सर्कलच्या अध्यक्षा लताताई कित्तूर यांनी स्वागत केले. लता कित्तूर, रवी माने, जगन्नाथ धर्माधिकारी व राजप्रभू धोत्रे यांनी दीपप्रज्वलन केले. रोहिणी गणपुले यांनी गायन केले. शास्त्रीय गायन व भक्तिगीत गायन यातील तिन्ही गटांसाठीची रोख पारितोषिके मधुमालती माने यांच्या स्मरणार्थ रवींद माने यांनी पुरस्कृत केली होती. संवादिनी वादनाची रोख पारितोषिके विजापुरे हार्मोनियम फाउंडेशन बेंगळूर यांनी पुरस्कृत केली होती. यासाठी रवींद्र माने व तेजस काटोटी यांचा सन्मान सर्कलतर्फे केला
गेला.
कलाश्री पुरस्कारप्राप्त राजप्रभू धोत्रे यांचा, परीक्षक प्रतिनिधी म्हणून जगन्नाथ धर्माधिकारी यांचा, ध्वनि संयोजनाची उत्तम सेवा बजावल्याबद्दल श्रीकांत प्रभू यांचा सन्मान केला. परीक्षकांतर्फे जगन्नाथ धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. आसावरी भोकरे यांनी निकाल जाहीर केला व आभार मानले. यावेळी रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.