प्रतिनिधी / शिरोळ
चिंचवाड तालुका शिरोळ येथील महावीर आदगोंडा पाटील यांनी आर्थिक फसवणूक झाल्याने निराश होऊन राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली जयसिंगपूर येथील उषा कुलकर्णी यांनी आर्थिक फसवणूक करून पाटील यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी उषा कुलकर्णी यांच्या विरोधात शिरोळ पोलीस ठाण्यात जीवनधंर महावीर पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
चिंचवाड येथील महावीर पाटील यांना पुणे येथील लिटीकेशन प्रॉपर्टीमध्ये मोठा हिस्सा मिळवून देतो असे सांगून उषा कुलकर्णी यांनी पाटील यांच्याकडून पैसे घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. आपण दिलेले पैसे पाटील यांनी मागितले असता तुमच्याकडे काय पुरावा आहे. तुम्ही मला पैसे दिले नाहीत असे कुलकर्णी यांनी पाटील यांना सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली. त्यामुळे महावीर पाटील यांनी नैराशेतून गुरुवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येस उषा कुलकर्णी याच जबाबदार आहेत. अशी फिर्याद जीवनधर पाटील यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिल्याने उषा कुलकर्णी यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे अधिक तपास करीत आहेत.