वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशातील उत्पादनाचा विकास दर(जीडीपी) 5 टक्क्यांवर राहणार असल्याचे अनुमान आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2019-20 मधील विकास दरासंदर्भातील हे पहिलेच अनुमान मांडण्यात आले आहे. तर याच काळात जीव्हीए 4.9 टक्क्यांवर राहिण्याचा अंदाज सादर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीतून मांडण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्षात 2018-19 मध्ये आर्थिक विकास दर 6.8 टक्क्यांवर राहिला होता. तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून (सीएसओ) मंगळवारी प्रथमच हा अंदाज सादर केला आहे. जीडीपीमधील घरसण होण्यास पुर्ननिर्माण क्षेत्रातील वृद्धीदर घट होण्याचे प्रमुख कारण राहिले आहे. चालू अर्थिक वर्षात पुनर्निर्माण क्षेत्रातील वृद्धीदर घटून 2 टक्क्यांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षात हा दर 6.2 टक्क्यांवर राहिल्याची नेंद केली होती. आगामी काळात कृषी निर्माण वीज गॅस आणि पाण्यासारख्या क्षेत्रातील वृद्धीदर घसरणार असल्याचे अनुमान मांडलेले आहे. तर उत्खन्न, लोक प्रशासन आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये हालक्या प्रमाणात सुधारणा होणार असल्याचे अंदाज व्यक्त केला आहे.