नवी दिल्ली
एक एप्रिलपासून सुरु होणाऱया आगामी आर्थिक वर्षाच्या दरम्यान भारताची इंधन विक्री ही जवळपास 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे संकेत आहेत. यामध्ये अर्थव्यवस्थेमधील सुधारणात्मक कल आणि पेट्रोल व डिझेलच्या मागणीमधील होत असणारी वाढ यामुळे हा वाढता टक्का वर्ष 2021-22 मध्ये वाढत जाणार असल्याचे तेल मंत्रालयाकडून सांगितले जात आहे.
तेल मंत्रालयातील पेट्रोलियम योजना आणि विश्लेषकांच्या माहितीनुसार वर्ष 2021-22 मध्ये पेट्रोलियम उत्पादनांची विक्री 21 कोटी 52.4 लाख टन होण्याची शक्यता आहे. यामध्ये 31 मार्च रोजी समाप्त होणाऱया चालू आर्थिक वर्षाची विक्री अंदाजे 19 कोटी 59.4 कोटी टन विक्रीवर राहणार असल्याची माहिती आहे. येत्या काळात इंधनाची विक्री सर्वाधिक तेजीत राहणार आहे. औद्योगिक उलाढालीसोबत इंधन विक्रीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कोरोनाचा फटका
कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि यामध्ये दोन महिन्यापेक्षा अधिककाळ लॉकडाऊनच्या केलेल्या घोषणेमुळे इंधन मागणीत मोठी घसरण अनुभवायला मिळाली होती.
एप्रिल-जानेवारी विक्री
चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जानेवारी या कालावधीदरम्यान इंधन विक्रीत 13.5 टक्क्यांची घसरण राहिली आहे. पीपीएसीने पेट्रोल आणि डिझेलची विक्री ही 13.2 टक्क्यांनी वृद्धीत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसऱया बाजूला जेट इंधन (एटीएफ)ची विक्री 74 टक्क्यांनी वाढली आहे. याचदरम्यान घरगुती गॅस एलपीजीची मागणी 4.8 टक्क्यांनी वाढून 2.9 कोटी टन राहिली आहे. वर्ष 2021-22मध्ये पेट्रोलची विक्री 3.13 कोटी टन होण्याचा अंदाज आहे. तर डिझेलची विक्री वाढून 8 कोटी 36.7 लाख टन राहण्याची शक्यता आहे.