जगातील श्रीमंतांच्या यादीत दहा-अकरावा नंबर प्राप्त
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतासह आशियातील दोन सर्वात मोठे उद्योगपती यामध्ये एक रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्यासाठी आर्थिक वर्ष 2021-22 हे यांच्यासाठी खुप लाभदायक ठरले आहे. सदरच्या वर्षात गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये 69.70 टक्क्यांनी वाढ झाली आहे, दुसऱया बाजूला मुकेश अंबानी यांची संपत्ती 20.67 टक्क्यांनी वाढत गेली आहे. या नेटवर्थबाबत अंबानी आशियात प्रथम तर अदानी दुसऱया स्थानी राहिले असल्याची नोंद केली आहे.
ब्लूमबर्गच्या बिलेनियर्स लिस्टमध्ये दिलेल्या अहवालानुसार मुकेश अंबानी जगामध्ये जवळपास 7.4 लाख कोटी रुपयांच्यासोबत 10 व्या स्थानी तर गौतम अदानी हे 7.3 लाख कोटीसोबत 11 व्या नंबरवर राहिले आहेत. आर्थिक वर्ष 22 मध्ये अदानी यांनी प्रत्येक दिवशी जवळपास 756 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर अंबानी यांनी प्रतीदिन 378 कोटी रुपये कमाई केल्याची माहिती आहे.
आर्थिक वर्ष 22 मधील महत्वाचे निर्णय
मुकेश अंबानी
w रिलायन्स ऍमेझॉन वादामध्ये फ्यूचर रिटेलवर मिळवले नियंत्रण
w न्यूयॉर्कमधील हॉटेल मँडरिन ओरिएटनची हिस्सेदारी घेतली
w जिओचा गुगलसोबत मिळून जिओ नेक्स्ट 4जी फोन सादर
गौतम अदानी
w डब्ल्यूबी ओडिसा, गुजरात तेलंगणा मधील 235 किमी रोड प्रकल्पावर केली सही
w 21 ऑक्टोबर रोजी जयपूर, गुवाहाटी व तिरुअनंतपुरम एअरपोर्टचे अधिग्रहण
w ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी मिलेनियर अदानी न्यू इंडस्ट्रीज लि.निर्मिती