मुंबई/प्रतिनिधी
अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अखेर २५ दिवसांनी मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना जामीन मंजूर केला आहे. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी माध्यमांशी बोलताना, आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमे हे शुक्रवारी किंवा शनिवारी तुरुंगातून बाहेर पडतील अशी आशा आहे.
आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुम धमेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. योगायोगाने, मुंबई उच्च न्यायालयासाठी दिवाळीची सुट्टी 1 नोव्हेंबरपासून सुरू होत असून ती 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. शनिवार आणि रविवार असल्याने 13 आणि 14 नोव्हेंबरलाही न्यायालय बंद राहणार आहे. आर्यन खानला आज किंवा शुक्रवारी जामीन मिळाला नाही नसता तर त्याला १५ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार होते. ऑर्डरचा कार्यकारी भाग उद्या सकाळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत आरोपी तुरुंगातच राहतील.
आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांनी मीडियाला सांगितले की आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा शुक्रवारी किंवा शनिवारी तुरुंगातून बाहेर पडतील अशी आशा आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खान आणि इतर 2 जणांना जामीन मंजूर केला आहे.आर्यनच्या वकिलाचे म्हणणे आहे की अशा अटकेसाठी मजबुत पुरावे असणे आवश्यक आहे. दीड तासांनंतर, एनसीबीने न्यायालयात युक्तिवाद पूर्ण केला. एएसजी अनिल सिंग यांनी साक्षीदार प्रभाकर साईलच्या प्रतिज्ञापत्राचा संदर्भ देत “पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता” असल्याचे सांगितले.