ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला गुरूवारी जामीन मंजूर झाला. आज मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं असून, आज आर्यन खानसह त्याचे सहकारी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांची तुरूंगाच्या बाहेर येण्याची शक्मयता आहे. दरम्यान, आर्यन खानसाठी अभिनेत्री जुही चावला जामीन होणार असून ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात पोहचली आहे.
आर्यन खानसह तिघांना एक लाख रुपयांच्या व्यक्तीगत जातमुचलक्यासह 14 अटींसह जामिन मंजूर केला आहे. त्या अटींनुसार आर्यनला जामिनदाराची गरज भासणार आहे. त्यासाठी जुही चावला न्यायालयात पोहचली आहे. तिने एक लाख रुपयांच्या जामीन हमीपत्रावर स्वाक्षरी केली असून, ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आर्यन खानचा तुरूंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.