नवी दिल्ली
ओडीसा राज्य सरकारसोबत पोलाद उत्पादक कंपनी आर्सेलर-मित्तल निप्पॉन स्टील कंपनीने नुकताच कारखाना स्थापण्यासाठी करार केला आहे. याअंतर्गत कारखान्यात 12 दशलक्ष टन क्षमतेचे पोलाद उत्पादन घेतले जाणार आहे. सदरचे उत्पादन केंद्राप्परा जिल्हय़ातील कारखान्यातून घेतले जाणार असून अंदाजे 50 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचे समजते. ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक व आर्सेलर-मित्तलचे सीईओ लक्ष्मी विलास मित्तल यांनी सहकार्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. लवकरच सदरच्या कामाला सुरूवात होणार असल्याचे समजते.