बेळगाव : बसुर्ते येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेत आर. एम. रेणके यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात नुकताच हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी रविंद्र हुंदळेवाडकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून लक्ष्मी कुराडे उपस्थित होत्या. यावेळी आर. एम. रेणके यांनी 39 वर्षे सेवा बजावून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याबद्दल एसडीएमसी कमिटी व शिक्षकवृंदाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रेणके यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारही मिळाला होता. प्रभारी मुख्याध्यापिका एस. एन. पाटील यांनी परिचय करून सरस्वती प्रतिमा पूजन केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. ए. के. तारिहाळकर यांनी आर. एम. रेणके यांच्या सेवेबद्दल प्रशंसोद्गार काढले. याप्रसंगी एसडीएमसी उपाध्यक्षा सरिता बेनके, सुमन हन्नुकर, मंदा मोदगे, लक्ष्मी कुंभार, भारती बेनके, रेखा बांडगे, गोपाळ बेनके, अशोक घुमटे, जोतिबा गोजगेकर, प्रभाकर गोजगेकर, राजू नाईक यासह ग्रा. पं. सदस्य, पालक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन एन. पी. पाटील यांनी केले. जी. डी. जाधव यांनी आभार मानले.
Previous Articleराष्ट्रीय विज्ञान अकादमी स्पर्धेत बेळगावच्या युवकांची बाजी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.