दसरोत्सवानिमित्त रहिवाशांची मागणी : काही ठिकाणी घातलेल्या कुंपणामुळे अडचण
प्रतिनिधी /बेळगाव
मिलिटरी प्रशासनाने संरक्षण खात्याच्या जागेभोवती तारेचे कुंपण घातले आहे. अरगन तलाव परिसरात गांधी चौक ते गणपती मंदिरपर्यंत जागेभोवती भिंत बांधून तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. यामुळे आर. ए. लाईनमधील दुर्गामाता मंदिरकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. दसरोत्सवाकरिता सदर रस्ता खुला करून देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
लष्कराच्या मालकीच्या शहर आणि उपनगरातील जागांभोवती सुरक्षेच्यादृष्टीने तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. मात्र काही ठिकाणी घालण्यात आलेल्या कुंपणामुळे नागरिकांना अडचणीचे बनले आहे. गांधी चौकाजवळ असलेल्या आर. ए. लाईन परिसरात दुर्गामाता मंदिर असून या ठिकाणी वर्षानुवर्षे पूजा-अर्चा केली जाते. दरवषी मोठय़ा उत्साहाने दसरोत्सव साजरा करून दुर्गामाता देवीची मिरवणूक काढली जाते. याकरिता आकर्षक रथ तयार केला जातो. मात्र येथील वसाहतीमध्ये कोणीच रहात नसल्याने आर. ए. लाईन वसाहत ओस पडली आहे. पण येथील मंदिराची देखभाल कॅम्प परिसरातील नागरिकांतर्फे केली जाते. मात्र मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावर कुंपण घातल्याने भाविकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे.
रस्ता खुला करून देण्यास नकार
मागील वर्षी तारेचे कुंपण खुले करण्याची मागणी ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन दसरोत्सवादरम्यान तारेचे कुंपण हटवून रस्ता खुला करण्यात आला होता. त्यानंतर हा रस्ता बंद करण्यात आला आहे. सध्या दसरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता खुला करावा, अशी विनंती कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्याकडे केली होती. पण यावेळी रस्ता खुला करून देण्यास नकार दर्शविला असून गणपती मंदिराकडून ये-जा करण्याची सूचना केली आहे. याठिकाणी गवत वाढले असल्याने भाविकांना ये-जा करताना अडचण निर्माण होत आहे. तसेच वृद्ध व लहान मुलांना चालत जाणे अशक्मय आहे. त्यामुळे दसरोत्सवादरम्यान तारेचे कुंपण हटवून रस्ता खुला करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.