पाचगाव / वार्ताहर
आर. के. नगर येथील रुमाले माळ मधील एकाच कुटुंबातील चोवीस सदस्यांनी घरीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आर . के . नगर रुमाले माळ येथील एकाच कुटुंबातील 24 सदस्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाला आला होता .माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणांमध्ये हे कुटुंब कोरोना पॉझिटिव आढळले होते . या 24 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाच वर्षीय ,आठ वर्षीय व नऊ वर्षीय अशा तीन लहान मुलांचा समावेश होता . 26 ते 60 वर्षे या वयामधील तेरा व्यक्ती होत्या .
तर आठ व्यक्ती या साठ वर्षे वयावरील होत्या ,त्यामध्ये एका 75 वर्षीय व्यक्तिचा देखील समावेश होता . या कुटुंबामधील एक व्यक्ती डॉक्टर आहे . त्यामुळे या कुटुंबीयांनी घरीच राहून उपचार घेण्याचे ठरवले होते .त्यानुसार 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घरीच उपचार घेतले आणि कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली . यामधील एकाही व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. बुधवारी या कुटुंबियांचा कॉरंनटाईन कालावधी पूर्ण झाला असल्याचे आरोग्यसेविका सी .जे .चोपडे यांनी सांगितले. पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी या एकाच कुटुंबातील 24 सदस्यांची तब्येत व्यवस्थित असून त्या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याचे सांगितले .पाचगावचे माजी उपसरपंच संग्राम पोवाळकर व प्रवीण कुंभार यांनी कोरोनावर वेळीच उपचार घेतल्यास त्यावर मात करता येते हे या कुटुंबीयांनी दाखवून दिल्याचे सांगितले .