प्रतिनिधी /सांखळी
सध्या पावसाळा सुरु झाल्याने समुद्रातील मासेमारी बंद आहे. त्यामुळे खवय्यांनी गावठी खेकडे आणि गरवणीचे मासे तसेच नदीतील मासाळीवर मोर्चा वळविला आहे. पावसाळय़ात शेतीतील तसेच ओहळ आणि नदीतील मासे जेवणातील रुची वाढवत आहेत. मासे गरवण्यासाठी ओहळ, नदी किनारी गळ घेऊन बसलेले पाहायला मिळतात. सांखळी बाजारात पावसाळी खेकडेही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. खेकडे शंभर रुपयांपासून पाचशे रुपयेपर्यंत आकारावर अवलंबून विकले जात आहेत.