टेक्नो पोव्हाचा स्मार्टफोन लाँच – 48 मेगापिक्सलचा कॅमेरा
बेंगळूर
आतापर्यंत आपण 5 हजार एमएएच बॅटरीचे मोबाईल फोन्स पाहिले आहेत. पण आता 7000 एमएएच इतक्या दमदार बॅटरीचा मोबाईल बाजारात लाँच झाला आहे. टेक्नो स्मार्टफोन आता वरील बॅटरीसह ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
अधिक क्षमतेची बॅटरी असणारा सदरचा स्मार्टफोन 13 हजार रुपयांच्या आत खरेदी करता येणार आहे. भारतात या गटात मिळणारा हा सर्वात स्वस्त किमतीचा स्मार्टफोन मानला जात आहे. विशेष म्हणजे याला 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच 128 जी.बी. स्टोरेज व 5 जीबी रॅमसह सदरचा फोन दाखल झाला आहे. यात विविध मॉडेल्स दाखल झाले असून त्यांच्या किंमती वेगवेगळय़ा आहेत. मायक्रो एसडी कार्डद्वारे यातील स्टोरेज वाढवता येते.
वैशिष्टय़े पाहूया…
? डिस्प्ले……. 6.9 इंच
? प्रोसेसर…… हिलियो जी85 चिपसेट
? रॅम स्टोरेज.. 6 जी.बी. रॅम व 128 जी.बी. स्टोरेज
? बॅटरी……… 7000 एमएएच
? चार्जिंग…… याला 18 व्हॅटची फास्ट चार्जिंग सुविधा
? कॅमेरा…….. 48 मेगापिक्सल
? अन्य………. टेक्नो पोव्हा 2 मध्ये डय़ुअल सिम,
………………. 4 जी व्होल्टे युएसबी टाईप- सी पोर्ट,
एफएम रेडियो, ब्लू टूथ 5.0