प्रतिनिधी /राय
कुडतरी मतदारसंघातून निवडून आलेले आलेक्स रिजीनाल्द लॉरेन्सो यांच्या शेकडो समर्थकांची काल शुक्रवारी त्यांच्या कुडतरी येथील निवासस्थानी बैठक झाली आणि यावेळी सर्वात ज्यादा जागा मिळवून विजयी झालेल्या भारतीय जनता पक्षाला कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या 20 वर्षात कुडतरी मतदारसंघाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व देण्यात आलेले नसल्यामुळे यंदा निवडून आलेल्या या प्रतिनिधीला मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. कुडतरी मतदारसंघातील मतदारांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.