नवी दिल्ली
यंदाच्या वर्षीदेखील भारतात मारुतीची आल्टो ही विक्रीत आघाडीवरची उत्कृष्ट कार ठरली आहे. सलग 16 व्या वर्षी आल्टोने नंबर वनचे स्थान पटकावले आहे. सन 2000 मध्ये बाजारात नव्याने दाखल झालेली आल्टो 2004 मध्ये विक्रीतील उत्कृष्ट कार म्हणून निवडली गेली. आजच्या स्पर्धात्मक युगात यावर्षी पुन्हा विक्रीत आघाडीवर राहण्याचा मान आल्टोने कायम ठेवलाय. उत्तम मायलेज, सुरक्षा साधने, एअरबॅग्ज अशी विविध वैशिष्टय़े या गाडीत आहेत.