कांदळी /वार्ताहर
आल्त पर्वरी येथील श्री साई दत्त महिला मंडळातर्फे गणेश चतुर्थीचे औचित्य साधून गौरी गणपती साठी कापसाच्या फुलांचा वस्त्रमाळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे सदर प्रशिक्षण वर्ग पिढीये कॉलनी येथील गुरु लक्ष्मी सभाग्रहात मोठय़ा उत्साहात संपन्न झाले.
या प्रशिक्षणात कापसाचा हार ,वस्त्र तयार करण्याची पद्धत दाखवण्यात आली . सदर हार गणेश मुर्ती इतर मूर्तीमूर्ती साठी किंवा फोटोला वाहण्याकरिता मोठा किंवा लहान आकाराचा करू शकतो. अश्या सोप्या पद्धतीने गौरी गणपती साठी कापसाच्या फुलांचे वस्त्र माळा तयार करू शकता यांचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले .
.त्यानंतर गणेश पुरी म्हापसा येथील प्रगत लालन महिला मंडळातर्फे श्रावण मासी या कार्यक्रमानिमित्त महिलांचा खास कार्यक्रम उत्तम रीतीने साजरा करण्यात आला.
यावेळी महिलाने मंगळागौरी यांची विशेष गाणे गायनी काही खेळ दाखवण्यात आले . यातील बस फुगडी ,तवा फुगडी ,झिम्मा पिंगा गोफ, सासु सुन भांडण , सवतीचे खेळ अशा बरेच मजेशीर खेळ खेळण्यात आले. यावेळी सर्व महिलांनी या खेळांचा आनंद लुटला. या कार्यक्रमास बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या