वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापूर – रत्नागिरी राज्य मार्गावर आवळी ता. पन्हाळा येथील दत्त ट्रेडर्स समोर विशाळगडाहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अॅपेरिक्षाला होडा – अॅक्टीवा या दुचाकीने ओव्हरटेक करीत अॅपे रिक्षाला समोरून धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन त्यातील आठजन जखमी झाले असून कोडोली पोलीस ठाणेत या अपघाताची नोंद झाली आहे. जावेद बुद्धण शेख वय ३१ रा. भोसले पार्क कदमवाडी जि कोल्हापुर या चालकाने दुचाकीस्वारा विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
होडा अॅक्टीवा स्कुटर – एमएच – ०९ एफई – ३९५९ चा चालक नाव पत्ता माहीत नाही याचेवर गुन्हा दाखल केला आहे. सोमवार दि. १६ रोजी सायंकाळी सहा वाजता घडलेल्या आपघातात शाहीन तनवीर शेख वय२७, हासिना ईमान शेख वय २६, शबाना मुन्ना पठाण वय ३५, माण हशमुद्दीन शेख वय ३३, सोबान इम्रान शेख वय १४, सोबीया ईमाण शेख वय ६, फरहान तन्वीर शेख वय ११, सर्व,विक्रमनगर कोल्हापुर व होडा अॅक्टीवा स्कुटर वरील बालक असे आठजन जखमी झाले असून त्याचेवर सेवा रूग्णालय बावडा येथे उपचार सुरू आहेत.गुन्ह्याचा तपास पो.ना.कोळेकर हे करीत आहेत . .