वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आवास योजनेसाठी बेंगळूर येथे 15 एकर जमिनीची खरेदी केली असल्याचे गोदरेज प्रॉपर्टीजने मंगळवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे. बेंगळूर येथील सर्जापूर या ठिकाणी सदरची जमीन गोदरेजने घेतलेली असून या व्यवहारातील रक्कमेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा खुलासा कंपनीकडून करण्यात आलेला नाही.
आगामी काळात 16 एकर जमिनीवर आवास योजनेअंतर्गत तब्बल 16 लाख वर्गफूट क्षेत्रफळाचा विकास करण्यात येणार आहे. तसेच याच ठिकाणी घरांसह अपार्टमेंटची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्याच्या घडामोडींच्या प्रक्रियेत कंपनीसाठी बेंगळूर हे शहर अतिशय महत्त्वाचे असून या शहरावरच येत्या काळात आम्ही अधिक लक्ष्य केंद्रित करणार असल्याचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांनी सांगितले आहे.