प्रतिनिधी / बेळगाव
आविष्कार महिला उद्योजक संस्था व केएलएस आयएमईआर संस्था यांच्यामधून समन्वय करार झाला आहे. मंगळवारी आयएमईआर सभागृहात आविष्कारच्या अध्यक्षा सुलभा खानोलकर व आयएमईआरचे संचालक डॉ. अतुल देशपांडे यांनी या करारावर स्वाक्षरी केली.
यावेळी सोसायटीचे चेअरमन ऍड. मुतालिक, डॉ. सुधीर कालकुंद्रीकर व डॉ. कीर्ती शिवकुमार आदी उपस्थित होते. या करारानुसार आयएमईआर संस्था आविष्कारला मनुष्यबळ, वित्त, उद्योजकता, गृहोद्योग याबाबत मार्गदर्शन करून सेवा देईल. याशिवाय आयएमईआरचे सभागृह, कार्यशाळेचा हॉल, वर्ग या सर्वांचा आविष्कारला वापर करता येईल. मात्र इतरांना उपद्रव होणार नाही याची काळजी आविष्कारने घ्यायला हवी.
आविष्कार सदस्यांना आयएमईआरच्या वाचनालयाचा लाभ घेता येईल. त्यासाठी त्यांना अतिथी सदस्यत्व देण्यात येईल. आविष्कारने आपले कार्यक्रम शक्मयतो आयएमईआर समवेत करावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
आविष्कार आयएमईआरच्या विद्यार्थ्यांना आविष्कार उत्सव आणि अन्य उपक्रमांमध्ये सहभागी करून घेईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कौशल्याचा अनुभव मिळेल. विविध उद्योजकांशी आयएमईआरच्या विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणेल. विद्यार्थ्यांना इंटर्नशीप व विविध प्रकल्पांची संधी उपलब्ध करून देईल. सदर कराराचा कालावधी 1/12/2029 पर्यंत असणार आहे.