प्रतिनिधी/ बेळगाव
आविष्कार महिला उद्योजक संस्थेतर्फे संक्रांतीनिमित्त टिळकवाडी, देशमुख रोडवरील सुभाष फोटोच्या जागेमध्ये महिलांनी तयार केलेल्या संक्रांतीच्या विविध साहित्याचे आणि पदार्थांचे स्टॉल सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये तिळगूळ, हलवा, तिळाची चिक्की, बाजरीचे पीठ, तिळाचे लाडू, दूध पोळी, हळीवाचे लाडू, सुकामेवा, विविध मसाले, सांडगे-पापड, तिखट यांचा समावेश आहे.
याशिवाय वाण म्हणून देण्यासाठी मोत्याच्या वस्तू व सुक्मयामेव्याची छोटी पाकिटे उपलब्ध आहेत. धनश्री रेडकर, अनिता दाभोळकर, विनती नाईक, माया हेरवाडकर, माधवी कुंभार, रेणुका खोत यांनी हे स्टॉल मांडले आहेत.
सकाळी 11 ते 8 या वेळेत 13 जानेवारीपर्यंत हे स्टॉल सुरू असणार आहेत. बेळगावकरांनी स्टॉलवरून खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. सोमवारी सकाळी आविष्कारच्या अध्यक्षा सुलभा खानोलकर, माजी अध्यक्षा रोहिणी गोगटे, खजिनदार यशश्री देशपांडे यांच्या उपस्थितीत स्टॉलचा शुभारंभ करण्यात आला.