वार्ताहर/ सांबरा
चंदगड (अष्टे) ता. बेळगाव येथील श्री आशाकिरण मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीची पाचवी सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेचे चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी लक्ष्मी फोटोपूजन केले. ज्येष्ठ संचालक बाळाराम मोटारी यांनी अहवाल वाचन करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. सभेला अरूण लाड, जोतिबा पाटील, बाळेशी कुरबर, कृष्णा चौगुले, भगवंत पाटील, नेताजी हिरोजी, मल्लाप्पा नाईक, श्वेता नाईक, सृष्टी देमाणे, सुलोचना यरझखी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.