बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना विविध मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. मान्यताप्राप्त सोशल हेल्थ अॅक्टिव्हिस्ट (आशा) कामगारांनी चांगल्या कामकाजाची स्थिती आणि आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी उपकरणांची मागणी करत आंदोलन सुरूच ठेवले आहे, कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीने (केपीसीसी) राज्य सरकारला त्यांच्या समस्यांकडे त्वरित लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, जयनगरचे आमदार सौम्य रेड्डी आणि इतरांनी मंगळवारी आशा कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पक्षाने आशा कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी सौम्या रेड्डी यांनी, “ ते १२ वर्षांपासून काम करीत आहेत आणि त्यांना राज्य व केंद्र सरकारकडून १२ हजार इतके वेतन आहे.” असे त्या म्हणाल्या.
तसेच त्यांनी ट्विट केले आहे की, “अद्याप त्यांच्या मागण्यांना कोणी प्रतिसाद न दिल्यास, @INCIndia आयोजित लवकरच या अन्यायाविरुध्द ‘ # बेंगळूर चलो ’निषेध आंदोलन करेल!” असे म्हंटले आहे.