ऑनलाईन टीम / मुंबई :
आशा वर्कर्सच्या मानधनात लवकरच वाढ होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज उपमुखमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी आशा वर्कर्स यांच्या मनाधनाबाबत चर्चा झाली.
दरम्यान, अमित ठाकरे यांनी आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज अजित पवार यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर पवार यांनी आशा वर्कर्स यांच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
केंद्राकडून आशा वर्कर्सना सध्या 2 हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामध्ये आता आणखी दोन हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. या सोबतच कोरोना काळात आशा वर्कर्सनी घरोघरी जाऊन जे काम केले आहे, त्याचे 15 हजार रुपये थकीत आहेत. हे थकीत 15 हजार लवकरात लवकर मिळावे अशी मागणी देखील यांनी केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत ही विचार करू असे आश्वासन दिले आहे.