जगातील 10 देशांमध्ये कामगिरी – निर्यातीत प्रगती
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोनाची दुसरी लाट थांबल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून ती अधिक गतीमान होताना दिसली. जगातील 10 मोठय़ा अर्थव्यवस्थेतेतील आशियाई देशांमध्ये भारत तिसऱया क्रमांकावर पोहचला आहे.
दुसऱया कोरोना लाटेच्या संकटावर मात करत भारताने निर्यातीत तेजी प्राप्त केली आहे. शेअर बाजारानेही तेजीचा विक्रमी सूर कायम ठेवला असून देशाच्या शेअर बाजारातील भांडवल दर महिन्याला 0.4 टक्के इतकी वाढ दर्शवत आहे.
भारताचा परकीय चलन साठा 620 अब्ज डॉलर्सच्या स्तरावर आहे. याबाबतीत चार देशांचा परकीय चलन साठा 600 अब्ज डॉलर्सवर आहे. भारताचा निर्यात वृद्धीदर 49.8 टक्के इतका आहे. उगवत्या देशांमध्ये भारताने आशियात चौथा क्रमांक पटकावला आहे. चीनला यात भारताने मागे टाकले आहे. 125 टक्के वृद्धीसह मेक्सिको आघाडीवर असून रशिया 72.9 टक्केसह दुसऱया स्थानी आणि 54.5 टक्केसह इंडोनेशिया तिसऱया स्थानी राहिला आहे. निर्यातीत भारताचा वाटा वाढताना दिसतो आहे.
बाजार भांडवलात भारतच पुढे
मेक्सिको, रशिया, चीन, इंडोनेशिया, ब्राझिलसह जगातील 10 उगवत्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय शेअर बाजार गुंतवणूकदारांना आकर्षित करताना दिसतो आहे. भारतीय शेअर बाजाराचे भांडवल दर महिन्याला 0.4 टक्के दराने वाढते आहे. यात मेक्सिको सोडल्यास इतर देशांच्या भांडवली बाजारात घसरणच अधिक दिसली आहे. रशियातील बाजारात भांडवल 2.3 टक्के घटले असून चीनचे बाजार भांडवल 0.2 टक्के इतके घसरले आहे.